सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी मार्च - एप्रिल २०१७ मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पोलीस शिपाई पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीमध्ये सिग्मा करिअर अकॅडेमी सिंधुदुर्ग च्या सर्वाधिक ९ उमेदवारांनी यश प्राप्त केलं आहे. या भरतीमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांचे सिग्मा संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व शिक्षक, व्यवस्थापक, कर्मचारीवृंद या सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले आहे .
