Wednesday, 26 April 2017

कृषि सेवक पदभरती - २०१५ सुचना

Krishi Sevak Recruitment 2015 - Notice.


कृषि सेवकांची रिक्त पदे भारांकन पद्धतीने भरणेसाठी माहिती उपलब्ध करून देणे बाबत.

                 कृषि सेवकांची ७३० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक २९-१२-२०१५ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीस अनुसरून अर्ज केलेल्या उमेदवारांची भारांकन पद्धतीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून प्रसिद्ध करावयाची आहे. परंतु बऱ्याच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी SSC, व कृषि पदविका / कृषि  पदवीची टक्केवारी नमूद केलेली नाही. तर बऱ्याच उमेदवारांनी चुकीची टक्केवारी नमूद केली, तसेच कृषि  पदविका / पदवी उत्तीर्ण वर्षाची चुकीची माहिती नमूद केली आहे त्यामुळे भारांकांन पद्धतीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करताना अडचणी येत आहेत. 

              तरी संबंधित उमेदवारांनी सोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत स्वतःची माहितीची खात्री करून SSC, व कृषि पदविका / कृषि  पदवी टक्केवारीमध्ये फरक असल्यास, टक्केवारी बिनचुक  नमूद केली नसल्यास किंवा टक्केवारी नमूद केली नसल्यास त्याबाबतची परिपूर्ण माहिती स्वयंसाक्षांकीत प्रतीसह संबंधित विभागीय कार्यालयात दिनांक ३०-०४-२०१७ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सादर करावयाची आहे. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 

Twitter Bird Gadget