महाराष्ट्र लोक सेवा आयोग MPSC मार्फत लिपिक टंकलेखक (मराठी - इंग्रजी) गट -क पूर्व परीक्षा- २०१७ व महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा २०१७ या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक २६-०४-२०१७ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तरी सदर दिनांकात वाढ करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवार सदर परीक्षेसाठी दिनांक २८-०४-२०१७ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.