Saturday, 29 October 2016

कोल्हापूर वनरक्षक पदभरती परीक्षा सूचना 2016

Kolhapur Forest Guard Examination Instruction 2016

वनरक्षक पदासाठी उमेदवारांची शारीरिक चाचणी (पुरुष उमेदवार धावणे - ५ किमी / महिला उमेदवार धावणे - ३ किमी अंतर अर्ध्या तासात पार करणे) दिनांक ०५-११-२०१६  ते १४-११-२०१६ या कालावधी मध्ये वेळापत्रकानुसार होणार आहे. तरी उमेदवारांनी स्वतःच्या ओळखपत्रात नमूद केलेल्या दिनांक व वेळेस उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहावे. उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र मंडळाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावयाचे आहे. तसेच उमेदवारांनी खालील प्रमाणपत्रे विहित नमुन्यात शारीरिक चाचणीवेळी आणणे बंधनकारक राहतील. 
(अ) उमेदवाराचे वचनपत्र व पालकाने द्यावयाचे वचनपत्र. 
(ब) उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र व पालकाचे सहमतीपत्र. 
(क) वैद्यकीय प्रमाणपत्र (शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे). 
(ड) लहान कुटुंबासंबंधी प्रतिज्ञापत्र. 

जर उमेदवारांनी वरीलप्रमाणे मूळ दस्ताऐवज आणले नाही तर उमेदवारास शारीरिक स्पर्धात्मक चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

Twitter Bird Gadget